Drugs Case : जाणून घ्या कोण आहेत NCB अधिकारी संजय सिंह, समीर वानखेडेच्या जागी सहा प्रकरणांची चौकशी करणार


दरम्यान आज समीर वानखेडे यांच्याकडे असेललं आर्यन खान प्रकरण आता एनसीबीच्या एका टीमकडे देण्यात आलंय. या नव्या टीमचं नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह हे करणार आहेत. Drugs Case: Find out who are NCB officials Sanjay Singh will investigate six cases in place of Sameer Wankhede


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेकांकडून समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यावर अनेक आरोप झाले.दरम्यान आज समीर वानखेडे यांच्याकडे असेललं आर्यन खान प्रकरण आता एनसीबीच्या केंद्रीय पथकाकडे देण्यात आलंय. या नव्या टीमचं नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह हे करणार आहेत.

जाणून घ्या कोण आहेत संजय सिंह?

संजय सिंह हे १९९६ च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांची प्रथम ओडिशा पोलिसात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांना ओडिशा पोलिसातच आयजीची जबाबदारी देण्यात आली. त्यांचे चमकदार काम पाहून सरकारने त्यांची सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती केली. सध्या संजय सिंग एनसीबीचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत.



संजय सिंह यांनी ड्रग्जशी संबंधित अनेक मोठ्या प्रकरणांचा तपासही केला आहे. त्यांनी ओडिशा आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचेही नेतृत्व केले आहे. आर्यन खान प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्या जागी नवाब मलिक यांच्या जावईचीही चौकशी संजय सिंह करणार आहेत.याशिवाय आणखी सहा प्रकरणे आहेत ज्यांची जबाबदारी संजय सिंह यांच्यावर देण्यात आली आहे.

Drugs Case: Find out who are NCB officials Sanjay Singh will investigate six cases in place of Sameer Wankhede

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात