मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला वंदन करून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाडा, खान्देश, मुंबईमध्ये संभाजीराजे दौरा करणार आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनापेक्षा तोडगा काढण्यावर भर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यातून काय मार्ग काढता येईल हे पाहणं महत्वाचं आहे. पण कोरोनाच्या काळात आंदोलन करणं चुकीचं आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांना भेटून चर्चा करणार असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. राज्य आणि केंद्र दोघांनी समन्वयाने यातून मार्ग काढावा मराठा समाजाला वेठीस धरू नये असं संभाजीराजे म्हणाले. तसंच यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले. Sambhajiraje Chhatrapati started state tour on Maratha Arakshan issue
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App