सायकलवरून चक्कर येऊन पडल्याने संभाजी भिडे गंभीर जखमी; सांगलीत रुग्णालयात दाखल


प्रतिनिधी

सांगली : हिंदुस्तान प्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे हे सांगलीत गणपतीच्या दर्शनाला जात असताना सायकलवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Sambhaji Bhide seriously injured due to dizziness on bicycle; Admitted to Sangli Hospital

संभाजी भिडे यांनी वयाची नव्वदी पार केली असून अद्याप पर्यंत ते स्वतंत्रपणे सायकलवर बसून सगळीकडे संचार करत होते. कालच मिरज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण त्यांनी भारताला तीन बाधा झाल्या आहेत. म्लेंछ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा. त्यामुळे हिंदुस्तानच्या समस्या वाढल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रूपाने म्लेंछ बाधा कायम आहे.



इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीमुळे आंग्ल बाधा कायम आहे, तर अजूनही आपल्याला निशस्त्रीकरणाचा हव्यास आहे त्यामुळे गांधी बाधा कायम आहे. यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपण 125 कोटी हिंदुस्थानवासियांचा रक्तगट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या प्रमाणे केला पाहिजे. संपूर्ण देशावर भगव्याचे राज्य आणले पाहिजे, असे वक्तव्य केले होते.

आज गणपती पेठेतून सांगली गणपती गणपतीच्या दर्शनाला जात असताना ते सायकल वरून चक्कर येऊन पडले. त्यांच्या खुब्याला मार लागला असून त्यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sambhaji Bhide seriously injured due to dizziness on bicycle; Admitted to Sangli Hospital

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात