किराणा दुकानातून वाईन विक्री : शरद पवारांकडून ठाकरे सरकारच्या आधीच्या धोरणाचे पुन्हा समर्थन!!


प्रतिनिधी

पुणे : किराणामाल दुकाने आणि सुपर मार्केट मधून वाईन विक्री करण्याचा निर्णय आधीच्या ठाकरे – पवार सरकारने घेतला होता मात्र महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड विरोधानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र ते सरकार गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे सरकारच्या अमलात न आलेल्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. Sale of wine from grocery shops: Sharad Pawar backs previous policy of Thackeray government

द्राक्ष महासंघाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते द्राक्ष महासंघाने शेतकऱ्यांसाठी चांगली कामगिरी केली आहे. अशी कामगिरी बाकी कोणत्याही फळ उत्पादक संघटनेची झालेली नाही, अशा शब्दात शरद पवारांनी द्राक्ष महासंघाची स्तुती केली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी आधीच्या ठाकरे – पवार सरकारच्या वाईन विक्री धोरणाचे समर्थन केले. ते म्हणाले, की किराणा दुकाने आणि सुपर मार्केट मधून वाईन विक्री करण्याचे धोरण योग्यच होते.

त्याचा लाभ द्राक्ष उत्पादकांना झाला असता. वाईन आणि द्राक्ष निर्यात या दोन्ही बाबींना मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या सरकारने निर्णय घेतला होता. परंतु, काही कारणाने त्या धोरणाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. हे दुर्दैवी आहे, असे वक्तव्य पवारांनी केले आहे.

किराणामाल दुकाने आणि सुपर मार्केट्स मधून वाईन विक्री करण्याचे धोरण ठाकरे – पवार सरकारने आखले होते. 1000 स्क्वेअर फुट पेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या दुकानांमधून वाईन विक्रीला मुभा देण्यात आली होती. परंतु, महाराष्ट्रात सर्व बाजूंनी त्या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळे त्या वेळचे सरकार वाईन विक्री धोरणाचे अंमलबजावणी करू शकले नव्हते. आता ठाकरे – पवार सरकार गेले आहे. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आहे अशावेळी शरद पवारांनी आधीच्या ठाकरे – पवार सरकारच्या वाईन विक्री धोरणाचे समर्थन केले आहे.

Sale of wine from grocery shops: Sharad Pawar backs previous policy of Thackeray government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात