Saki Naka rape : आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले – आरोपीला सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!


मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल,गुन्हेगाराला सुटका नाही ,असं आश्वासन देत फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.Saki Naka rape: Accused remanded for 10 days, CM: Accused will not be released, trial to proceed in fast track court!


विशेष प्रतिनिधी

 मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल,गुन्हेगाराला सुटका नाही ,असं आश्वासन देत फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

यादरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला.या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती खुप गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होता.दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.


साकीनाका ‘निर्भया’ प्रकरण : ३० वर्षीय पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आरोपी गजाआड, महाराष्ट्रातून संतापाची लाट


याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की , “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार झाला आणि नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे.त्यामुळे गुन्हेगारास कठोर शिक्षा दिली जाईल.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले ,यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत.यावेळी ते म्हणाले  झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Saki Naka rape: Accused remanded for 10 days, CM: Accused will not be released, trial to proceed in fast track court!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय