खेड तालुक्यात सैराट, प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या, हॉटेलमालकाच्या मारहाणीत प्रियकरासह मित्राचा मृत्यू, प्रेयसीही जखमी

विशेष प्रतिनिधी

पुणे : खेड तालुक्यात चाकणजवळील करंजविहिरे गावात सैराटची पुनरावृत्ती झाली. प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या करण्यात आली.हॉटेलमालकाच्या मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यातच दोघांचा मृत्यू झाला. मारहाणीत प्रेयसीही जखमी आहे. Sairat film incident occurred in Khed , murder of two in a love affair, death of a friend along with boyfriend in hotel owner’s beating, girlfriend also injured

बाळू सीताराम गावडे आणि त्याचा मित्र राहुल गावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नवे आहेत. दोघे वीटभट्टीवर कामाला होते. बाळू आणि वीटभट्टी मालकाची मुलगी 14 तारखेला पळून गेले होते. यासाठी राहुल गावडेने मदत केली होती. यावरुन मुलीच्या वडिलाने बाळू आणि राहुल या दोघांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बाळू गावडे (26) आणि राहुल गावडे (28) हे दोघे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आसखेड गावचे रहिवासी होते. चाकणजवळच्या करंजविहिरे गावात एकावीटभट्टीवर कामाला होते. या वीटभट्टी मालकाचं हॉटेलही आहे. या वीटभट्टी मालकाला 21 वर्षांची मुलगी आहे. बाळू आणि या मुलीचं प्रेमप्रकरण जुळलं होतं. या प्रेमप्रकरणाला मुलीच्या घरातून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.



दोघांना राहुल गावडेने मदत केली होती. राहुलच्या मदतीने बाळू आणि वीटभट्टी मालकाची मुलगी पळून गेली. त्यामुळे वीटभट्टी मालक प्रचंड संतापला होता. त्याने राहुल आणि बाळू यांना शोधून काढले. बाळूसोबत मालकाची मुलगीही होती. त्यांनी राहुल आणि बाळू यांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी मुलीलाही मारहाण झाली आहे. तिलाही दुखापत झाल्याने ती जखमी आहे.

पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह एकूण 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Sairat film incident occurred in Khed , murder of two in a love affair, death of a friend along with boyfriend in hotel owner’s beating, girlfriend also injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात