समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी आक्रमक झाले असून बेळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. Sachin Sawant attacks BJP government; Said – ‘BJP compares Modi with Shivaji Maharaj.’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी आक्रमक झाले असून बेळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.यावेळी सावंत म्हणले की,भाजप मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करतेय.महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही
पुढे सावंत म्हणले की , ”बंगळुरुला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. तर चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्टात हे अजिबात खपून घेतल जाणार नाही”
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध नोंदवताना सावंत म्हणाले की , ”शिवरायांच्या नावाचा उपयोग संधीसाधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचे हा भाजपाचा कट आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार मराठी भाषिकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणी करत त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App