प्रतिनिधी
मुंबई : आज 30 सप्टेंबर 2022 ललिता पंचमी बरोबर पाच दिवसांनी विजयादशमी या दिवशी दोन शिवसेनांची झुंज दसरा मेळाव्यात होणार आहे दसरा मेळाव्यात गर्दी वॉर होणार आहे पण त्याआधी टीजर वॉर सुरू झाले आहे. जंगलात जसे दोन वाघ प्रत्यक्ष झुंजीपूर्वी एकमेकांवर गुरकावत असतात तसे हे टीचर वार आहे. Rush War at Dussehra Mela; But before that the teaser war
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने कालच आपल्या दसरा मेळाव्याचे टीजर जाहीर केले. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून आसमानात शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा कायम फडकवत ठेवा, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा “एकलव्य” असा उल्लेख करून धर्मवीर आनंद दिघे यांचाही त्यामध्ये समावेश केला आहे.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 30, 2022
एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 30, 2022
शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज शिंदे गटाच्या टीजरला प्रत्युत्तर दिले आहे. “एक नेता एक झेंडा एक मैदान” असे शिवसेनेच्या टीचर मध्ये आवर्जून नमूद केले असून दसरा मेळावा आणि शिवतीर्थ यांचे अभिन्नत्व जनतेच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरच संबोधित केले आहे. वाजत गाजत या, पण शिस्तीत या असे ते नेहमीच आवाहन करीत असत. त्यांच्या या आवाहनाला मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेने नेहमीच आलोट प्रतिसाद दिला होता. तोच धागा पकडून ठाकरे गटाने आपलाच दसरा मेळावा खऱ्या शिवसेनेचा असल्याचे जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.
तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. पण शिवसेनेच्या 40 आमदारांना एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले असून ठाकरे गटाच्या गर्दी पेक्षा आपली गर्दी जास्त असली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन वाघ दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांशीच झुंजताना दिसणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांची मुलुख मैदानी तोफ नेहमी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासारख्या पक्षांवर धडधडत असायची. पण यंदा प्रथमच शिवसेना हे नाव धारण केलेले दोन गट एकमेकांविरुद्ध डरकाळ्या फोडणार आहेत. शिंदे गटाविरुद्ध डरकाळी फोडण्यासाठी ठाकरे गटाच्या भागाला काँग्रेस-राष्ट्रवादीची विशेष रसद असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App