राष्ट्रपत्नी टिपण्णी : सत्ताधारी भाजप संसदेत आक्रमक; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी काकुळतीला!!; माफी मागण्यास तयार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी “राष्ट्रपत्नी” अशी चुकून टिपण्णी केल्याचा मुद्दा संसदेत जबरदस्त तापला असून सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेतले आहे अधिरंजन चौधरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणि देशाची माफी मागितली पाहिजे या मागणीवरून सत्ताधारी भाजपने संसदेचे कामकाज बंद पाडले आहे. मात्र या मुद्द्यावर खुलासा देताना अधीरंजन चौधरी अक्षरशः काकुळतीला आल्याचे दिसले आहेत. Ruling BJP Aggressive in Parliament; Congress leader Adhir Ranjan Chaudhary

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात बोलण्याच्या ओघात त्यांनी “राष्ट्रपत्नी” असा उल्लेख केला. अर्थात हा उल्लेख संपूर्णपणे गैरच होता. त्यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. सत्ताधारी भाजपने काँग्रेस आणि अधीर रंजन चौधरी यांना जबरदस्त घेरले. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनी देखील अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचा खुलासा केला. परंतु, हा विषय संसदेत देखील तापला. राज्यसभेचे नेते पियुष गोयल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या नेत्यांनी संसदेच्या दोन्ही सदनात हा मुद्दा लावून धरला आणि सोनिया गांधी अधीर रंजन चौधरी आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाने माफी मागावी अशी मागणी केली.

भाजपचा आक्रमक सदस्यांमुळे संसदेचे कामकाज त्यामुळे तहकूब करावे लागले. राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे. आदिवासी महिला त्या पदावर विराजमान आहे. अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या जेष्ठ काँग्रेस नेत्याला त्या पदाचा सन्मान करणे जमत नाही का?, असा जळजळीत सवाल निर्मला सीतारामन यांनी केला. स्वतः अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे वेळ मागितली आणि या संदर्भात आपल्याला खुलासा करण्यासाठी संसदेत लोकसभेत बोलू दिले जावे, अशी मागणी केली. त्यांना ओम बिर्ला यांनी भेटीची वेळ दिली देखील परंतु प्रत्यक्षात ते चौधरी यांना भेटू शकले नाहीत. याच काळात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सत्ताधारी भाजपने बंद पाडले.

अधीर रंजन काकुळतीला, माफी मागायला तयार

त्यानंतर पत्रकारांची बोलताना आधीर रंजन चौधरी यांनी मी स्वतः राष्ट्रपतींकडे जाऊन त्यांची माफी मागायला तयार आहे. मला संसदेत बोलू दिले पाहिजे. माझे निवेदन ऐकून घेतले पाहिजे. परंतु सत्ताधारी भाजप या छोट्या मुद्द्याला मुद्दामून हवा देत असून त्यांना महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजना या विषयावर चर्चा करायची नसल्याने ते संसदेचे कामकाज बंद पडत आहेत, असा आरोप केला.

संसदेतून निलंबित केलेले विरोधी पक्षांचे 50 खासदार आधीच गांधी पुतळ्यापाशी आंदोलन करत आहेत. त्यात आता आदरणीय चौधरी यांचे राष्ट्रपती या टिपण्णीवरून भर पडली आहे. सत्ताधारी पक्ष भाजप यानिमित्ताने विरोधकांचे सर्व उट्टे काढण्याच्या बेतात आहे.

Ruling BJP Aggressive in Parliament; Congress leader Adhir Ranjan Chaudhary

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात