दिवाळी सणानिमित्त पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.Rules announced for Diwali in Pune, police permission required for sale of firecrackers
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाचा प्रादुर्भव सरत आहे. प्रकरणे देखील कमी आढळत आहे. दिवाळी सणानिमित्त पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने पुणे पोलिसांकडून तात्पुरते फटाके विक्री परवाने देण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेबंर या कालावधीसाठी हे परवाने असणार आहेत. या कालावधीत विक्रेत्यांना विदेशी मूळ फटाक्यांची विक्री करता येणार नाही, असे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.
तसेच मुदत संपल्यावर फटाके किंवा शोभेच्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही. रस्त्यात किंवा रस्त्यापासून १० मीटरच्या अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे फटाके किंवा रोषणाईचे फटाके चालविण्यास बंदी घातली आहे.
नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. फटाक्यांच्या दुकानाच्या ५० मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री १० ते ६ वाजे पर्यन्त बंदी घालण्यात आली आहे.
तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामात परत करणे आवश्यक असल्याचेदेखील नियमावलीत म्हटले आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App