शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसला विजयी करा – नितीन बानगुडे पाटील


बानगुडे म्हणाले की , खोटे बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती आज केंद्र सरकारची झाली आहे.Win Congress for the honor of farmers – Nitin Bangude Patil


विशेष प्रतिनिधी

नांदेड : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर –बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेद्वार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ कुशावाडी येथे जाहीर सभा झाली.या सभेत शिवसेनेचे उपनेते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी मत व्यक्त केले.

ते म्हणाले की , शेतकऱ्यांची चेष्टा करणे, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वाहने घालणे ही बाब पुन्हा पुन्हा होवु नये म्हणुन शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अंतापुरकरांना विजयी करा. पुढे बानगुडे म्हणाले की , खोटे बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती आज केंद्र सरकारची झाली आहे.

दरम्यान या प्रचारसभे दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मत व्यक्त केले आहे. यावेळी सचिन सावंत म्हणले की , सोयाबीनचे भाव अचानक कसे कमी होतात केंद्र सरकारने कुठेतरी भांडवलदारांची सुपारी घेतली आहे की काय अशी शंका येत आहे. इंधनाचे दरवाढ झाल्याने जनसामान्यांची आर्थिक घडी खुळखुळी झाली आहे. त्याचबरोबर पिकविमा कंपनीला केंद्राचा हप्ता आणखी दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही.

Win Congress for the honor of farmers – Nitin Bangude Patil

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था