विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आता स्वस्त झाली आहे. १ एप्रिलपासून ८५० ऐवजी ६०० रुपयांमध्ये चाचणी केली जात आहे.RTPCR test is in only Rs 600 at Airport
राज्य सरकारच्या आदेशानांतर विमान प्राधिकरणाने हे दर कमी केले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत सुमारे तीन लाख प्रवाशांची कोरोना चाचणी विमानतळावर करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आठ तासांत दिला जातो. आता केवळ ६०० रुपयांत चाचणी केली जात आहे. शिवाय तात्काळ अहवालाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ४५०० रुपये शुल्क आकारले जात आहे.
त्याचा अहवाल १३ मिनिटांत प्रवाशांना दिला जातो. त्यासाठी टर्मिनस एकवर आठपेक्षा जास्त नोंदणी डेस्क आणि सहा चाचणी बुथ उभारण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
चाचणी केल्यापासून ७२ तासांपर्यंतचा अहवाल गृहीत धरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. एखाद्या प्रवाशाकडे तसा अहवाल नसल्यास त्याची गैरसोय होऊ नये म्हणून विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App