प्रतिनिधी
डेहरादून – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम संपूर्ण हिंदू समाजाची एकजूट करण्याचे आहे. समाजात ५० टक्के महिला आहेत. त्यांचाही सहभाग संघाच्या कार्यक्रमांमध्ये असायला हवा, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.RSS Chief Dr. Mohan Bhagwat expects 50% women participation in RSS programs
उत्तराखंडातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. भागवत यांनी यावेळी संघाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दा आवर्जून उपस्थित केला. हिंदू समाज संघटित करणे हाच संघाचा मुख्य हेतू आहे.
पण जेव्हा आम्ही संघाचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.
डॉ. भादवत म्हणाले, की ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळते. आपणच मुलांना घरात काय पहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे. लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर वेगळ्या प्रकारचे राज्य केले.
आपल्या देशातही सध्या हेच सुरू आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल, याची आठवण डॉ. भागवत यांनी करवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App