रिक्षाचा संप PMPML च्या पथ्यावर! ‘पीएमपी’च्या तिजोरीत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न


प्रतिनिधी

पुणे : पुण्यात रिक्षा संघटनांनी सोमवारी केलेल्या संपामुळे पुणेकरांची मोठी गैरसोय झाली खरी पण या रिक्षा चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल त्यांच्या मदतीसाठी उभी राहिली. सोमवारी झालेल्या रिक्षा चालकांच्या संपामुळे एकाच दिवसात तब्बल १५ लाखांहून अधिक प्रवाशांनी पीएमपीच्या बसने प्रवास करणं पसंत केले. त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न जमा झाले. पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक झाली आहे. Rickshaw strike on the path of PMPML! Huge income for the first time.



असे वाढले पीएमपीचे उत्पन्न

यापूर्वी ४ जानेवारी २०१६ आणि १४ नोव्हेंबर रोजी दोन कोटी रूपयांच्या उत्पन्नाचा टप्पा पीएमपीएमएलला पार करता आला होता. परंतु, त्यावेळी पास विक्रीची रक्कम २० लाखांहून जास्त होती. यंदा प्रथमच निव्वळ तिकीट विक्रीतून उत्पन्न वाढले आहे. पीएमपीने दोन्ही शहरांबाहेरील जिल्ह्यातील ११ मार्गावरील वाहतूक २६ नोव्हेंबर रोजी केली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील १०० बसही शहरांतर्गत वाहतुकीसाठी पीएमपीला वापरता आल्यात. तर पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या आणि ई-बसची संख्या वाढत आहे. या बसचा प्रवास आरामदायी असल्याने ज्येष्ठांसह महिला, विद्यार्थी यांनी देखील पीएमपी बसमधून प्रवास करणं पसंत केले आहे.

  • संपाच्या दिवशी पीएमपीची कामगिरी
  • संपाच्या दिवशी पुण्यातील रस्त्यावर १ हजार ७४० पीएमपी बस धावल्या
  • सामान्य परिस्थिती असताना एरवी धावणाऱ्या बसेसची संख्या १ हजार ६००
  • एकूण १५ लाख ४७ हजार प्रवाशांनी बसमधून केला प्रवास

Rickshaw strike on the path of PMPML! Huge income for the first time.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात