विशेष प्रतिनिधी
मुंबई : मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने रिक्षाचालक महिलेला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना नेरूळ नवी मुंबईत घडली आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.संबंधित महिला ही सीबीडी बेलापूरमधून नेरूळ सेक्टर १० येथे रिक्षांमधून प्रवासी घेऊन येत होती.Rickshaw puller beaten; Traumatic event: Chitra Wagh
मात्र उतरतानाभाड्याच्या वादातून महिलेला प्रवाशांनी मारहाण केली. मीटर प्रमाणे रिक्षाचे भाडे ७५ रुपये झाले होते. मात्र आम्ही पन्नास रुपये देऊ, असा ठेका धरून प्रवाशांनी वाद घातला व तिला मारहाण केली.
राणेंच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही ; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका
ही मारहाण अत्यंत दुर्दैवी असल्याचे भाजपच्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्या संबंधित रिक्षाचालक महिलेची भेट घेण्यासाठी वाशी येथील रुग्णालयात आल्या होत्या. मात्र rt-pcr टेस्टमध्ये रिक्षाचालक महिला पॉझिटिव्ह आल्याने त्या महिलेला भेटू शकल्या नाही असेंही त्यांनी म्हंटले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App