महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर मागील महिन्यातील ४.९१ टक्क्यांवरून ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा हा आकडा पाच महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. किंबहुना खाद्यतेल, महाग भाजीपाला आणि महागडे पेट्रोल, डिझेल, वीज यामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये किरकोळ दर ४.५९ टक्के होता.Retail Inflation Data Large rise in retail inflation in December on account of food and expensive fuels
वृत्तसंस्था
मुंबई : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर मागील महिन्यातील ४.९१ टक्क्यांवरून ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा हा आकडा पाच महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
किंबहुना खाद्यतेल, महाग भाजीपाला आणि महागडे पेट्रोल, डिझेल, वीज यामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये किरकोळ दर ४.५९ टक्के होता.सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात अन्नधान्य महागाईचा दर ४.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे,
तर नोव्हेंबर महिन्यात खाद्यान्न महागाईचा दर १.८७ टक्के होता. इंधन आणि वीज महागाई 10.95 टक्क्यांवर आहे. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत इंधन आणि वीज महागाई कमी झाली असली तरीही ती दुहेरी अंकात आहे.
कपडे, पादत्राणे महाग झाले आहेत. कपडे आणि पादत्राणांच्या महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 7.94 टक्क्यांवरून 8.30 टक्के राहिला.प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते, तर अनेक राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला होता. किरकोळ चलनवाढीत वाढ झाली आहे,
परंतु ती अजूनही 2 ते 6 टक्के महागाई दराच्या आरबीआयच्या लक्ष्याच्या आत आहे. मात्र, वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करत आरबीआयने म्हटले आहे की, या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App