लोकल सेवा बहाल करा; अन्यथा जनतेचा उद्रेक ;भाजपचे केशव उपाध्ये यांचा गंभीर इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी खुली करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. लोकांच्या संयमाची परीक्षा सरकरने घेऊ नये. अन्यथा लोकच सविनय आंदोलन करून लोकल सेवेचा लाभ घेतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.Restore local service; Otherwise an outbreak of mass : Keshav Upaadhye warns state government

मुंबईची लोकल सेवा बहाल करण्याच्या मुद्यावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या शिवाय त्यांनी राज्याच्या धरसोड धोरणाचे आणि एकही कोरोना रुग्णाचा ऑक्सिजनभावी मृत्यू झाला नाही, या सरकारच्या प्रतिज्ञापत्र या मुद्यावर सरकार टीकास्त्र सोडले.



राज्य कोरोनाविरोधी लसीकरण झाले आहे. ,एक ते दोन डोस अनेकांनी घेतले आहेत. असे असताना लोकल सेवेचा लाभ घेण्यास सरकार का रोखत आहे, असा प्रश्न त्यांनी केला. अगोदरच निर्बंधामुळे लोक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत लोकल प्रवास जनतेसाठी फायदेशीर ठरू शकतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

कोरोना निर्बध शिथील करताना सरकारची धरसोड वृत्ती दिसत आहे. सरकारचे धोरण म्हणण्यापेक्षा ते ‘धोरण लकवा’ असेच त्याचे वर्णन करावे लागेल, असे उपाध्ये म्हणाले.राज्यात एकही कोरोना रुग्णाचा ऑक्सिजनभावी मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने दाखल केले आहे.

दुसरीकडे राज्य सरकार ऑक्सिजन त्रुटी वरून केंद्र सरकारला यापूर्वी दोषारोप करत होते. स्वतः च्या त्रुटी लपविण्यासाठी सरकारने कांगावा केला आणि सरकारचा खोटारडेपणा या निमित्ताने उघड झाल्याचे ते म्हणाले.

  • मुंबईत लोकल सेवा सामान्यांना पुन्हा बहाल करा
  •  लोकांचा संयम सुटतोय ,अन्यथा जनतेचा उद्रेक
  • अगोदरच निर्बंधामुळे लोक आर्थिक संकटात
  • मुंबईकरांसाठी लोकल जीवनवाहिनी आहे
  • सरकारचे धोरण म्हणण्यापेक्षा ते ‘धोरण लकवा’ आहे
  • सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे खोटारडेपणा उघड
  • त्रुटी लपविण्यासाठी ऑक्सिजनवरून कांगावा

Restore local service; Otherwise an outbreak of mass : Keshav Upaadhye warns state government

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात