पोलिसांच्या 7500 पदांसाठी लवकरच भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संभाजीनगरात घोषणा


प्रतिनिधी

संभाजीनगर : महाराष्ट्रात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये दिली. तसेच शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण आणि परिसर विकासासाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. Recruitment soon for 7500 posts of police

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अभिवादनप्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी त्यांनी संवादही साधला. या पुतळ्याच्या सुशोभिकरणासह परिसरासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.


Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??


पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. या प्रक्रियेसंदर्भात मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत आपली चर्चा झाली असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या तरुणांशी त्यांनी अनौपचारिक संवादही साधला. या पोलीस भरतीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

‘या’ मान्यवरांची उपस्थिती 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे आदी उपस्थित होते.

Recruitment soon for 7500 posts of police

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात