प्रतिनिधी
संभाजीनगर : महाराष्ट्रात सरकार पुढील 3 महिन्यांत 30000 शिक्षकांची भरती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही, तर राज्य सरकार शिक्षक भरतीबाबत सकारात्मक आहे. 2012 पासून भरती बंद होती. ती आम्ही सुरू केली. पुढील 3 महिन्यात 30000 शिक्षकांची आम्ही भरती करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.Recruitment of 30000 teachers in next 3 months in Maharashtra
सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे शक्य नाही, अशी माहिती फडणवीस यांनी नियोजन आयोगाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली यावेळी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते.
https://youtu.be/mAmWdplDEsk
मराठवाड्याच्या २०२३-२४ वार्षिक नियोजनाची बैठक बुधवारी पार पडली. सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्याचा नियोजन विभागाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर विविध जिल्ह्यांच्या आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री तानाजी सावंत कृषी मंत्री अब्दुल सत्तार सहकार मंत्री अतुल सावे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते.
बुधवारी साडेचार तास फडणवीस यांनी विभागांचा आढावा घेतला.यामध्ये लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्यात येण्याची मागणी उपमुख्यमंत्राकडे केली तसेच औषधी आरोग्य संदर्भातील विविध प्रश्न यावर चर्चा करत त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नियोजनामध्ये साधारण 15 ते 20 % वाढीव निधी सरकार देते. मात्र या बैठकीत सर्व जिल्ह्यांनी 100 कोटींपेक्षा अधिकच निधीची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सर्व जिल्हा अधिकारी यांनी देखील नियोजन मध्ये वाढीव निधी देण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत मात्र आचारसंहिता असल्यामुळे कुठल्याही मंत्र्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. आगामी बजेटमध्ये या मागण्यांचा विचार करून त्याबाबत तरतूद केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App