दिलासादायक बातमी : राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, एप्रिल अखेरमधील चित्र ; कोरोना बाधित ६६ हजार तर ७४ हजार झाले बरे


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, दोन माहिन्यात बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच होती. शुक्रवारची (ता.२३ ) आकडेवारी मात्र थोडी दिलासादायक आहे. कारण एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आली आहे. Reassuring news: The number of recoveries in the state is increasing, picture in late April; Corona affected 66 thousand and 74 thousand became better



राज्यात शुक्रवारी ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी ७४ हजार ४५ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. बाधित होणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त आहे. या महिन्यात प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हा कल काही दिवस कायम राहिल्यास, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.

मुंबईत दिवसभरात काय ?

  • मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७२ रुग्णांचा मृत्यू
  • नवीन ७२२१रुग्ण सापडले आहेत.
  • राज्यात दिवसभरात काय ?
  • दिवसभरात ७७३ मृत्यू
  • कोरोनाचे ६६ हजार ८३६ रुग्ण आढळले
  • ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले
  • एकूण बाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६
  • एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण बरे होऊन घरी
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८१ टक्के
  • कोरोना मृत्युदर १.५२ टक्के

चाचण्या आणि निष्कर्ष

  • २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ नमुने पॉझिटिव्ह आहेत.
  • राज्यात ४१ लाख ८८ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइन असून २९ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Reassuring news : The number of recoveries in the state is increasing, picture in late April; Corona affected 66 thousand and 74 thousand became better

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात