रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला; राणेंची उच्च न्यायालयात धाव, पण…


वृत्तसंस्था

रत्नागिरी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.रत्नागिरी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.Ratnagiri Sessions Court rejects Narayan Rane’s pre-arrest bail application; Rane runs in high court, but …

मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. यातून तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.



दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? तुम्ही लाथा घाला म्हणता त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत? कोणी चौकीदार चोर आहे म्हणते त्यावर ऑफेन्स का नाही दाखल होत?,” असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सरकारची दुटप्पी भूमिका योग्य नाही. भूमिका एकच राहिली पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

फडणवीस यांनी खासगी आयुष्यावरुन होणाऱ्या टीकेसंदर्भात आपण कधीही मुद्दा उपस्थित केला नसल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, की आमचे तर आम्ही बोलतच नाही, आमच्याविरुद्ध आमच्या परिवाराविरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, पत्नीविरुद्ध तुम्ही काय काय केले. तो आमचा वैयक्तिक मामला आहे.

आम्ही त्याला सक्षम आहोत. तो माझा प्रश्नच नाही. पण मी एवढेच सांगू शकतो की दुटप्पी भूमिका असू नये. या विधानातून त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर त्यांच्या सोशल मीडियातून होणाऱ्या अश्लाघ्य टीकेबद्दल अप्रत्यक्षपणे वक्तव्य केले.

दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी सकाळी एकत्र जमून भाजपच्या रिकाम्या असलेल्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करून शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांचा उल्लेख कुटुंबप्रमुख म्हणून करीत होते.

नारायण राणे यांच्या बैलाला… वगैरे घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या काचा फुटल्या. पण या वेळी ते कार्यालय बंद होते. तेथे कोणीही हजर नव्हते.

Ratnagiri Sessions Court rejects Narayan Rane’s pre-arrest bail application; Rane runs in high court, but …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात