कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

पुणे : कुख्यात गुंडांच्या बहिणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षका विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून फसवणूक करण्यात आली.Rape case filed against police sub-inspector

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जरदे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. जरदे सध्या पुणे शहर वाहतूक शाखेत येरवडा विभागात नेमणुकीस आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरदे हा कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये नेमणुकीला होता. मे 2018 मध्ये त्याची या तरुणीसोबत ओळख झाली. ही तरुणी ब्युटीशियन म्हणून काम करते. तिचा भाऊ गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याच काळात त्या दोघांची ओळख झाली.

त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला भुगाव येथील गंधर्व लॉज तसेच ‘द वन सोसायटी’ येथील फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने तिच्या सोबत लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली.

तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर या उपनिरीक्षकाने ‘मी पोलिस अधिकारी आहे. तुझे तुकडे तुकडे करून तुला संपवून टाकीन. कोणी माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. मी सर्व मॅनेज करू शकतो.’ अशा प्रकारची धमकी दिली. यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Rape case filed against police sub-inspector

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण