राज्य सरकारकडून 15 ऑगस्टपासून कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे.Raosaheb Danve said, Uddhavji should give a letter, we will immediately start Mumbai Local for all
विशेष प्रतनिधी
मुंबई : मुंबई लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. दरम्यान याच उत्तर रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. ते म्हणाले की ,”मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही,आम्ही १५ ऑगस्टपासून परवानगी दिली आहे. आता जरी परवानगी मागितली तरी आमची कोणतीही अडचण नाही, आम्ही परवानगी देऊ, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
तसेच राज्य सरकारकडून 15 ऑगस्टपासून कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 8 ऑगस्टला जनतेशी संबोधित करताना याबाबतचीही दानवे यांनी माहिती दिली.
महत्त्वाची बाब म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.
अनंत गीतेंच्या वक्तव्यावरही दानवेंनी भाष्य केलं. एका विशिष्ट उद्देश्याने सोबत आलेले हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांचे काही तरी राजकीय प्रॉब्लेम आहेत म्हणून ते सोबत आहेत. आता अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन आणि अशाच प्रकारची वक्तव्ये करतील, अशी भविष्यवाणीही दानवेंनी केली.
सत्तेसाठी तिन्ही पक्षांनी तडजोड केलीय. अमर अकबर अँथनी यांची तीन तोंडं तीन दिशेला आहे. त्यांच्या समस्या आहेत म्हणून एकत्र आहेत. हे एकमेकांवर आरोप करत राहतील आणि सत्तेसाठी एकत्रही राहतील. ते तिघे काय एकमेकांवर टीका करतात आणि कशा पद्धतीने बोलतात. मी आणि सुभाष देसाई कोणती भाषा वापरतो, कसं बोलतो, यावरून राजकीय दिशा समजून घ्या, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App