सिंधुदुर्ग पोलिसांनीच कायदा पाळला नाही, ६५ वर्षांवरील व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीला बोलावताच येत नाही, फडणवीस आक्रमक

Rane Case Sindhudurg police did not follow the law A 65-year-old man can't even call a witness at the police station, Fadnavis is aggressive

Rane Case : राज्यात सध्या भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा बँक निवडणुकीतील हल्ला प्रकरणात अटक होणार की बेल मिळणार हा विषय चर्चेत आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले. राणेंनी मी नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगणार नसल्याचं विधान केलं होतं. यावरून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. तथापि, यावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवत टीका केली आहे. Rane Case Sindhudurg police did not follow the law A 65-year-old man can’t even call a witness at the police station, Fadnavis is aggressive


प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सध्या भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा बँक निवडणुकीतील हल्ला प्रकरणात अटक होणार की बेल मिळणार हा विषय चर्चेत आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले. राणेंनी मी नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगणार नसल्याचं विधान केलं होतं. यावरून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. तथापि, यावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवत टीका केली आहे.

ट्वीटरवर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल!

दरम्यान, फडणवीस यांच्या या आरोपांवर अद्याप पोलिसांचे म्हणणे समोर आलेले नाही. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री राणेही पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय दिला होता. दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर काही वेळातच निकाल अपेक्षित आहे. जिल्हा बँक निवडणुकीत मतदानानंतर भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. यामुळे त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Rane Case Sindhudurg police did not follow the law A 65-year-old man can’t even call a witness at the police station, Fadnavis is aggressive

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण