मुंबईत अंमली पदार्थांची सर्रास तस्करी; महाराष्ट्राचे गृहमंत्री गाढ झोपेत आहेत काय? ; आमदार अतुल भातखळकर यांचा परखड सवाल

प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे-पवार सरकार टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहे. दुसरीकडे मुंबईत क्रुझवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाने केले. तस्करी सुरु असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहेत काय?, असा परखड सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे- पवार सरकारला केला. Rampant drug trafficking in Mumbai; Is Maharashtra Home Minister fast asleep? : MLA Atul Bhatkhalkar’s tough question

मागील वर्षभरात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले. राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वातील ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड केला, किमान त्यानंतर तरी राज्याच्या गृह विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची गरज होती.
दोन दिवसांपूर्वी एनसीबीने टाकलेल्या छाप्यात आर्यन खानसह अनेक युवकांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ते दोन वर्षांपासून अंमली पदार्थाचे सेवन करत आहेत. राजधानी मुंबईत देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित आहे. ते सुद्धा हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहेत. कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते यांनी तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत जणू अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे दाखवून दिले.

गुन्हेगारीने डोके वर काढले

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री हे सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अंमली पदार्थांची खुलेआम विक्री रोखावी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे ,असा सल्ला भातखळकर यांनी दिला आहे.

Rampant drug trafficking in Mumbai; Is Maharashtra Home Minister fast asleep? : MLA Atul Bhatkhalkar’s tough question

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात