रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल; छत्तीसगडचे दिग्गज नेते, रायपूरचे सलग सहावेळा खासदार ते केंद्रीय मंत्री!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून आता नव्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील. Ramesh Bais, Governor of Maharashtra; Chhattisgarh’s veteran leader, Raipur’s first ever MP to Union Minister!!

कोण आहेत रमेश बैस?

  • रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४८ रोजी रायपूरमध्ये झाला.
  • रमेश बैस हे झारखंडचे दहावे आणि विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांनी जुलै २०१९ ते जुलै २०२१ पर्यंत त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण, पर्यावरण आणि वन या मंत्रालयांची धुरा सांभाळली आहे. ते १९८९ आणि १९९६-२०१९ या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर सलग सहा वेळा निवडून गेले.
  • १९७८ मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. १९८० मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर रमेश बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.
  • पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात रमेश बैस यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अनेक खाती सांभाळली
  • मार्च १९९८ ते ऑक्टोबर १९९९ : पोलाद आणि खाण राज्यमंत्री
  • ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००० : रासायनिक खते राज्यमंत्री
  • सप्टेंबर २००० ते जानेवारी २००३ : माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  • जानेवारी २००३ ते जानेवारी २००४ : खाण मंत्रालय
  • जानेवारी २००४ ते मे २००४ : पर्यावरण आणि वन मंत्रालय
  • रमेश बैस यांची आज 12 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली आहे.

Ramesh Bais, Governor of Maharashtra; Chhattisgarh’s veteran leader, Raipur’s first ever MP to Union Minister!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात