रामदेव बाबांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या पलिकडची इमेज बिल्डिंग!!


विनायक ढेरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि योगगुरु रामदेव बाबा यांची भेट झाली आहे. या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचे आणि धर्मकारणाचे खरे वारस आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असे ते म्हणाले आहेत. Ramdev Baba’s visit; Chief Minister Eknath Shinde’s image building beyond Shiv Sena

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे आणि ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पलिकडच्या इमेज बिल्डिंगची आहे. एरवी “लो प्रोफाइल” म्हणून शिवसेनेत वावरलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आले. सत्ताधारी असलेल्या किंबहुना ठाकरे घराण्यातला मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर पराभूत करून त्यांनी शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी घडवून आणली. यामुळे आधीच त्यांचे नाव देशपातळीवर पोहोचले आहेच, पण आता “केवळ बंडखोर” ही इमेज एकनाथ शिंदे यांना त्यांचे राजकीय भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने पुरेशी पडणार नाही. बंडखोरी पलिकडे देखील एक “पॉझिटिव्ह इमेज” ही त्यांची खरी राजकीय गरज आहे आणि या राजकीय गरजेतूनच रामदेव बाबांची भेट हा विषय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

रामदेव बाबांकडून स्तुती

रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदे यांची जी स्तुती केली आहे, तिच्यावर राजकीय टीकाटिपण्या कितीही होऊ देत, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत. एकनाथ शिंदे हे सनातन हिंदू धर्माचे भूषण आहेत, अशी वक्तव्ये रामदेव बाबांनी केली आहेत त्याला वेगळे महत्त्व आहे आणि ते काही प्रमाणात राजकीय चौकटी पलिकडे जाणारे देखील आहे. कारण रामदेव बाबांवर ते मोदी समर्थक असल्याचा शिक्का जरी असला तरी त्यांची इमेज त्या पलिकडची देखील आहे आणि बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये देखील त्यांचे समर्थक आणि अनुयायी पसरलेले आहेत.

शिंदेंची पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंग

रामदेव बाबा यांनी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्वाच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसा संदर्भात नाव घेणे याला विशेष महत्त्व आहे. एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनेही राष्ट्रीय पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंगची ही तयारी आहे. त्याहीपेक्षा वास्तववादी लिहायचे झाले, तर शिंदेंच्या शिवसेनेपलिकडच्या पॉझिटिव्ह इमेज बिल्डिंगची ही तयारी आहे. अर्थात त्यासाठी फक्त रामदेव बाबांनी स्तुती करणे एवढ्या पुरतेच मर्यादित राहून चालणार नाही, तर त्या पलिकडे जाऊन देखील बऱ्याच बाबींचा सखोल विचार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला करावा लागणार आहे.

राष्ट्रीय इमेज बिल्डिंग सोपी नाही

राष्ट्रीय इमेज बिल्डिंग एवढी सोपी नाही. महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांनी आतापर्यंत भरपूर प्रयत्न करून झाले आहेत. पण त्यात त्यांना तितकेसे यश लाभलेले नाही. या इतिहासातून धडा घेऊन एकनाथ शिंदे यांनी एकापाठोपाठ एक दमदार पावले टाकली आणि ती स्थिर राहिली तर आणि तरच एकनाथ शिंदे यांची इमेज खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या पलिकडच्या नेतृत्वाची तयार होऊ शकेल. अन्यथा रामदेव बाबा यांनी त्यांची केलेली स्तुती ही महाराष्ट्रात फक्त परसेप्शन लेव्हललाच राहील आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्वही राष्ट्रीय नव्हे, तर प्रादेशिकच राहील.

Ramdev Baba’s visit; Chief Minister Eknath Shinde’s image building beyond Shiv Sena

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात