राज्यसभा सहावी जागा : भाजपशी तडजोडीच्या महाविकास आघाडीत हालचाली; शब्द पवारांचा पण नुकसान शिवसेनेचे!!


नाशिक : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार निघून आणणारच अशी राणा भीमदेवी थाटातील घोषणा करणारे शिवसेनेचे नेते महाविकास आघाडी मध्ये अचानक सुरू झालेल्या तडजोडीचे राजकारणाच्या हालचालींमुळे यामुळे बॅकफूटवर गेलेले दिसत आहेत.Rajya Sabha 6th seat: Movements in Mahavikas Aghadi compromised with BJP; Word of Pawar but loss of Shiv Sena

महाविकास आघाडीचे नेते पडद्यामागून भाजपशी तडजोड करण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगडी यांना दगाफटका होऊ शकतो याची शक्यता बळावल्याने काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही घटक पक्षांवर तडजोडीसाठी भाजपची तडजोडीसाठी दबाव आणला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसची जादाची मते देण्याचा शब्द शरध पवारांनी दिला आहे, पण तडजोडीच्या राजकारणात खरे नुकसान शिवसेनेचे होताना दिसत आहे.राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे. यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध केली तर त्या बदल्यात भाजपच्या भाजपला विधान परिषद निवडणुकीत पाचवी जादाजी जागा देण्याची तडजोड होऊ शकते. त्यामुळे भाजप राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा अर्ज मागे घेऊन विधान परिषदेत आपल्या ताकदी पेक्षा अधिकची एक जागा पदरात पाडून घेऊ शकतो. याचा अर्थ भाजपला राज्यसभा आणि विधान परिषदेत गमावण्यासारखे काही नाही. उलट एका अतिरिक्त जागेजी कमाई होऊ शकते.

त्याच बरोबर निवडणुका बिनविरोध झाल्याने महाविकास आघाडीची मते फुटणार नाहीत आणि आपल्याकडे बहुमत असल्याचा आघाडीचा दावा कागदोपत्री कायम राहील.

शब्द पवारांचा, नुकसान शिवसेनेचे

पण यामध्ये शिवसेनेचे मात्र नुकसान होणार आहे. 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसताना त्या पक्षाला 2 खासदार राज्यसभेवर पाठवण्यासाठी शिवसेनेने 2 वर्षांपूर्वी तडजोड केली होती. फौजिया खान या शिवसेनेच्या जादा मतांवर राज्यसभेत पोहोचल्या आहेत. त्या बदल्यात 2022 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 2 खासदार राज्यसभेत पाठवण्याचा शब्द शरद पवारांनी दिला आहे. मात्र महाविकास आघाडी खरंच तडजोडीच्या राजकारण्याच्या हालचाली चालल्या असतील आणि खरंच भाजपशी राज्यसभा निवडणुकीत तडजोड झाली तर पवारांनी शब्द देऊनही शिवसेनेला नुकसान सोसावे लागल्याचे दिसून येईल.

Rajya Sabha 6th seat: Movements in Mahavikas Aghadi compromised with BJP; Word of Pawar but loss of Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती