मनसे-भाजप युतीच्या चर्चा . त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय रणनिती आखतात आणि पक्ष कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Raj Thakrey: My dear Maharashtra soldiers … Raj Thackeray’s special appeal to the workers on the occasion of his birthday … I will meet you in a few days …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वरून एक खास पत्र लिहिलं आहे .या पत्रात त्यांनी आपल्या येणाऱ्या वाढदिवसानिमीत्त पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे . सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाला भेटण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन राज यांनी केलंय. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे, पक्षाच्या धोरणांविषयी-नव्या कार्यक्रमांविषयी मला बोलायचं आहे…तोपर्यंत जिथे आहात तिथे पूर्ण काळजी घेऊन रहा असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
१४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. या दिवशी कृष्णकुंज या निवासस्थानी अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी येत असतात. परंतू सध्या कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती, आजुबाजूची रुग्णसंख्या या परिस्थितीचा अंदाज घेत राज ठाकरेंन कार्यकर्त्यांना आपल्याला भेटण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो… माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/aCx1f4m3uW — Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो… माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/aCx1f4m3uW
— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021
गेल्या काही वर्षांतली मनसेची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नाही. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. यानंतर मनसेला ओहोटी लागली. लोकसभा निवडणुकांध्ये पक्षाचं मताधिक्य कमी झालं यानंतर २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा एक आमदार निवडून आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App