वृत्तसंस्था
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून शिवतीर्थ या नवीन घरात राहायला जाणार आहेत. कृष्णकुंज या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर शिवतीर्थ ही पाच मजली नवी वास्तू उभारली आहे. Raj Thackeray will stay at Shivteerth from today; Entrance to the new house आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी आपल्या नव्या घरात प्रवेश केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन करण्यात आलं. शिवतीर्थ असे या नव्या घराचे नाव आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत ठाकरे कुटुबीयांनी गृहप्रवेश केला आहे.
राज ठाकरेंचं नवं घर कृष्णकुंज जवळ असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था आहे. तसेच कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी होतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. नव्या घरात भव्य ग्रंथालय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App