पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काही घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवलेलं आहे. अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे हे कळत नाही. काय-काय गोष्टी बाहेर येतील त्यानं धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही, मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय.Raj Thackeray Speech The horns on the mosque have to be lowered, otherwise we too will put Hanuman Chalisa on double loudspeakers, Raj Thackeray warns
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त दिलेलं भाषण राज्यभरात चर्चेत आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर कडाडून हल्ला चढवला. राज ठाकरे म्हणाले की, “ईडी, आयकरच्या धाडी टाकत आहेत. या झोपडपट्ट्यातील मदरशांवर धाडी टाका, ही पंतप्रधानांना विनंती आहे. पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काही घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवलेलं आहे.
अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे हे कळत नाही. काय-काय गोष्टी बाहेर येतील त्यानं धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही, मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय.
निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला!
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्षे ठरली हे जनतेला कधीच सांगितले नाही. निकाल लागल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची टूम काढली अन् राष्ट्रवादी- काँग्रेससोबत बस्तान मांडले. मुख्यमंत्रिपदाची बाब चार भिंतीत का ठेवली, महाराष्ट्राला सांगणे गरजेचे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
परप्रांतीयांवरही पुन्हा निशाणा
राज ठाकरे म्हणाले, ज्याने काम केले त्याला बाजूला सारलं. ज्याने काम केले नाही त्याला सत्तेवर बसवलं. मतदारांचं कौतुक वाटतं. नाशिक महापालिकेत काम करून त्याची पावती काय मिळाली? मग कोण काम करेल. लफंगेगिरी करून सत्ता मिळवायची असेल तर तेच करू. मग चांगुलपणाची अपेक्षा करू नका. रस्त्याने चालताना फूटपाथ नाही, गाड्या चालवायच्या, तर वाहतूक कोंडी आली. झोपडपट्ट्या वाढतात. 1995 आणि आजची परिस्थिती पाहा. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आली. झोपडपट्टी वासीयांना फुकट घरे ही गोष्ट चांगली नाही, असं मी मा. बाळासाहेबांना सांगितलं होतं. त्यांचा उद्देश चांगला होता. हेतू चांगला होता. पण त्यानंतर फुकटं घरं मिळतायेत हे पाहून लोंढेंच्या लोंढे मुंबईवर आदळले.”
राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली ही लोकं आहेत. पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड दिले जातात. महाराष्ट्र विशेषत: मुंबईत बकालपणा आणला. चार-चार मजले बेहराम पाड्यात उभे राहिले. मातोश्रीतून बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस केल्यानंतर बेहराम पाडा. सत्ता असूनही काहीही घडले नाही. बेहराम पाडे वाढले. तीच परिस्थिती मुंब्राची आहे असंही राज म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App