raj kundra porn case : पॉर्न मूव्ही बनवण्यासाठी आणि काही अॅप्सद्वारे प्रसारित करण्यासाठी मुंबई कोर्टाने बिझनेसमन आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (19 जुलै) रात्री कुंद्राला अटक केली होती. या प्रकरणातील कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. raj kundra porn case now poonam pandey sherlyn chopra and kangana ranaut reacts
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पॉर्न मूव्ही बनवण्यासाठी आणि काही अॅप्सद्वारे प्रसारित करण्यासाठी मुंबई कोर्टाने बिझनेसमन आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (19 जुलै) रात्री कुंद्राला अटक केली होती. या प्रकरणातील कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पॉर्न प्रकरणावर तिन्ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॉलीवूड गटाराची उपमा तिने दिली आहे. राज कुंद्रा यांच्या अटकेच्या बातमीवर कंगनाने लिहिले की, म्हणूनच मी फिल्म इंडस्ट्रीला गटार म्हणतो. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने बॉलीवूडचा पर्दाफाश करण्याविषयीही चर्चा केली आहे.
कंगनाने लिहिले की, चमकणारी प्रत्येक गोष्ट सोन्याची नसते. माझ्या आगामी प्रॉडक्शन टिकू वेड्स शेरू चित्रपटात मी या इंडस्ट्रीच्या अनेक लपलेल्या बाबींचा उलगडा करणार आहे. ती म्हणाली की, आपल्याला नैतिकतेवर आधारित विवेकाची एक मजबूत व्यवस्था गरजेची आहे. कोणी असं पाहिजे जो सर्वांवर नजर ठेवून प्रत्येकाचे कान खेचू शकेल.
याव्यतिरिक्त काही बातम्यांनुसार, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला निवेदने दिली असून या दोघांनीही राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. याखेरीज यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सागरिका शोना सुमन मीडियाच्या समोर आली होती आणि राज कुंद्राने तिच्याकडून न्यूड ऑडिशन्सची मागणी केल्याचा आरोप केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, शेरलिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी राज कुंद्राकडून 30 लाख रुपये देण्यात आले आहेत. डीएनएच्या वृत्तानुसार शर्लिनने राज कुंद्राबरोबर असे सुमारे 15 ते 20 प्रोजेक्ट केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राविरोधात भक्कम पुरावे आहेत. एफआयआरनुसार या प्रकरणात राज कुंद्राचे नाव शर्लिन चोप्राने पोलिसांसमोर घेतले होते.
त्याचवेळी मॉडेल सागरिका शोना सुमनने ‘एबीपी न्यूज’ला सांगितले की, गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान राज कुंद्राच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉलद्वारे न्यूड ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते. सागरिकाने सांगितले की, राज कुंद्राचा उजवा हात असलेल्या उमेश कामतने तिला वेबसाइटसाठी वेब सिरीज ऑफर करून न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले होते.
सागरिका म्हणाली की, अशा ऑफरसाठी ती मानसिकरीत्या तयार नव्हती. तिने जेव्हा नकार कळवला तेव्हा सांगण्यात आले की, या वेब सिरीजमागे शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रासारखे मोठे नाव आहे. परंतु असे असूनही सागरिकाने त्यांच्यासाठी अश्लील पद्धतीने ऑडिशन देण्यास नकार दिला. तिने दावा केला की नकार असूनही उमेश कामतने तिला या ऑफरवर आणि न्यूड ऑडिशन देण्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अश्लील चित्रपट बनविणे आणि काही अॅप्सद्वारे ते प्रसारित करण्याचे प्रकरण फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेत दाखल झाले. या प्रकरणात आम्ही राज कुंद्राला 19 जुलै 2021 रोजी अटक केली होती, कारण तो मुख्य सूत्रधार होता. आमच्याकडे याविषयी पुरेसे पुरावे आहेत. उपनगरातील मालवणी पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका महिलेने पोलिसांकडे जाऊन तक्रारीत काही आरोप केले होते, त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला. ते म्हणाले की, या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आणि गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. यापूर्वीही आम्ही अश्लील चित्रपट बनविण्याबाबत गुन्हे दाखल केले होते, ज्यात एका अभिनेत्रीसह काहीजणांना आरोपी करण्यात आले होते.
“आम्ही राज कुंद्रा यांच्यावरील केसचा तपास करू आणि या प्रकरणाचा पूर्वी नोंदलेल्या अश्लील चित्रपटांशी संबंधित काही संबंध आहे की नाही हे शोधून काढू.” या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
raj kundra porn case now poonam pandey sherlyn chopra and kangana ranaut reacts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App