MISS INDIA USA 2021 : जाणून घ्या कोण आहेत वैदेही डोंगरे, ज्यांनी जिंकला ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब

Know who is Vaidehi Dongre, who has won the title of Miss India USA 2021

MISS INDIA USA 2021 : मिशिगनच्या वैदेही डोंगरे हिने ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब जिंकला आहे. या स्पर्धेची उपविजेतेपदी जॉर्जियातील अर्शी लालानीची निवड झाली, तर उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी तिसऱ्या स्थानावर राहिली. 1997च्या मिस वर्ल्ड स्पर्धा विजेत्या डायना हेडन या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या आणि मुख्य जज होत्या. यामध्ये अमेरिकेच्या 30 राज्यांमधील 61 सहभागींनी भाग घेतला. यादरम्यान ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत विजेत्यांची निवड करण्यात आली. तिन्ही प्रकारांतील विजेत्यांना मुंबईत होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिकीटही देण्यात आले आहे. Know who is Vaidehi Dongre, who has won the title of Miss India USA 2021


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मिशिगनच्या वैदेही डोंगरे हिने ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब जिंकला आहे. या स्पर्धेची उपविजेतेपदी जॉर्जियातील अर्शी लालानीची निवड झाली, तर उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी तिसऱ्या स्थानावर राहिली. 1997च्या मिस वर्ल्ड स्पर्धा विजेत्या डायना हेडन या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या आणि मुख्य जज होत्या. यामध्ये अमेरिकेच्या 30 राज्यांमधील 61 सहभागींनी भाग घेतला. यादरम्यान ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत विजेत्यांची निवड करण्यात आली. तिन्ही प्रकारांतील विजेत्यांना मुंबईत होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिकीटही देण्यात आले आहे.

मिशिगनमध्ये राहते वैदेही

25 वर्षीय वैदेही डोंगरे यांनी मिशिगन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदवी संपादन केली. ती एका मोठ्या कंपनीत बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करते. ‘मिस इंडिया यूएसए 2021’ सोबतच कथक नृत्याच्या चमकदार अभिनयासाठी वैदेहीने ‘मिस टॅलेंटेड’ हा किताबही जिंकलेला आहे. या विजयानंतर वैदेही म्हणाली, “मला समाजात एक सकारात्मक आणि दूरगामी परिणाम सोडायचा आहे. त्याचबरोबर मला महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या शिक्षणावरील विषयांवर काम करण्याची इच्छा आहे.”

स्पर्धेची उपविजेती अर्शी लालानी ब्रेन ट्यूमरने ग्रस्त

स्पर्धेची उपविजेती अर्शी लालानी यांनीही आपल्या चमकदार कामगिरीने व आत्मविश्वासाने जजेसना प्रभावित केले. 20 वर्षीय लालानी ब्रेन ट्यूमरने ग्रस्त आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रख्यात अनिवासी भारतीय धर्मात्मा सरन आणि नीलम सरन यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी ‘वर्ल्डवाइड पीजंट्स’च्या बॅनरखाली ही स्पर्धा सुरू केली होती. ‘मिस इंडिया यूएसए’ ही भारताबाहेर प्रदीर्घ काळापासून चालत आलेली भारतीय सौंदर्य स्पर्धा आहे.

Know who is Vaidehi Dongre, who has won the title of Miss India USA 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात