नाशिक : मुंबई महाराष्ट्रात 30 जून 2022 रोजी सत्तांतर झाले आणि 1 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीला सामोरे गेले आहेत. Raising his hand like Nawab Malik, Sanjay Raut went to the ED office
मुंबईच्या ईडी कार्यालयाला कार्यालयात चौकशीसाठी जाताना संजय राऊत यांनी नवाब मलिक यांच्यासारखाच हात उंचावला आहे. मलिकांसारखाच हात उंचावत ते ईडी चौकशीला सामोरे गेले आहेत. गेल्या दोन तासांपासून संजय राऊत ईडी कार्यालयात आहेत. नवाब मलिक देखील असेच ईडी कार्यालयात गेले होते तेथूनच त्यांची रवानगी परस्पर ईडीच्या कोठडीत केली होती. नंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते त्यानंतर बऱ्याच न्यायालयीन लढाया झाल्या. पण नवाब मलिक अजूनही तुरुंगा बाहेर आलेले नाहीत.
Maharashtra | Shiv Sena leader Sanjay Raut arrives at the ED office in Mumbai in connection with the Patra Chawl land scam case. pic.twitter.com/4DvvmmKBrr — ANI (@ANI) July 1, 2022
Maharashtra | Shiv Sena leader Sanjay Raut arrives at the ED office in Mumbai in connection with the Patra Chawl land scam case. pic.twitter.com/4DvvmmKBrr
— ANI (@ANI) July 1, 2022
मुंबईतल्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे मित्र निकटवर्ती प्रवीण राऊत अडकले आहेत त्यांना तुरुंग वारी घडली आहे आता याच प्रकरणात संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे. या चौकशी आधीच त्यांचे राहते घर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली काही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. आता 1034 कोटींच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग किती याची तपशीलवार चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत. या चौकशीतून नेमके काय बाहेर येणार??, संजय राऊत यांची किती दिवस चौकशी चालणार??, याची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणे अपेक्षित आहे.
ईडीच्या चौकशीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी दररोजच्या वक्तव्यांमधून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. परंतु आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाताना मात्र त्यांची बॉडी लँग्वेज बदलली होती आणि ईडी चौकशीवर आपला विश्वास आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. माध्यमांनी त्यांच्यातला हा बदल टिपला आहे. पण त्याचबरोबर नवाब मलिक जसे हात उंचावत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते आणि नंतर त्यांना तुरुंगवारी घडली आहे तसेच संजय राऊत हे हात उंचावतच ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत त्यांचे नेमके पुढे काय होणार??, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App