यशवंत जाधवांसह अनेक कंत्राटदारांच्या 35 ठिकाणांवर छापे; 130 कोटींची मालमत्ता गोत्यात!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर सलग तीन दिवस आयकर विभागाचे छापे चालू होते. या संदर्भात अधिकृत रित्या आयकर विभागाने काही सांगितले नसले, तरी आयकर विभागाच्या सूत्रांनी धक्कादायक माहिती दिली आहे.Raids on 35 locations of several contractors including Yashwant Jadhav

यशवंत जाधव यांच्यासह अनेक कंत्राटदारांच्या 35 ठिकाणांवर छाप्याची कारवाई करण्यात आली असून तब्बल 130 कोटी रुपयांची मालमत्ता गोत्यात आली आहे. संबंधित मालमत्तेची अजूनही मोजदाद सुरू असून नेमका आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकांची विविध कंत्राटे देण्याच्या कामांमधून दलाली घेऊन मालमत्ता गोळा करण्यात आली आहेत. यामध्ये स्थावर मालमत्तांही समावेश आहे. आयकर विभागातील सुत्रांच्या हवाल्याने आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.

यशवंत जाधव यांच्या घरातून 2 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी देण्यात आली होती. परंतु बाकीचे तपशील त्या वेळी देण्यात आले नव्हते. प्रत्यक्षात यशवंत जाधव आणि कंत्राटदारांची हातमिळवणी खूप जुनी आहे. त्यातून हवाला रॅकेट सारखे प्रकार घडले आहेत. परदेशांमध्ये पैसा गेला आहे. याबाबत आयकर विभागाबरोबर अन्य केंद्रीय तपास संस्था देखील ऍक्टिव्हेट झाल्याची बातमी आहे. मात्र, अधिकृतरित्या याबाबत अद्याप तरी कोणत्याही विभागाने संबंधित खात्यांचे तपशील जाहीर केलेले नाहीत.

Raids on 35 locations of several contractors including Yashwant Jadhav

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण