राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान; भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे भाजपकडे बोट!!


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून सावरकरांचा अपमान केला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जाब विचारला, तर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपकडेच बोट दाखविले आहे.Rahul Gandhi targets Savarkar, but Shivsena UBT questions BJP over bharat ratna to Veer Savarkar

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत केरळ आणि कर्नाटक मध्ये सावरकरांची पोस्टर्स दिसली त्यावरून त्यांना बंगलोर मधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर सावरकरांनी ब्रिटिशांकडून स्टायपेंड मिळवला होता, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. सावरकरांचा हा अपमान शिवसेना कशी सहन करते??, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केला.



वीर सावरकर कर्तव्यपथ का नाही??

मात्र आज त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनात अग्रलेख लिहून देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावरच निशाणा साधला आहे. सावरकरांबाबत शिवसेनेने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. सावरकरांना भारतरत्न किताब द्यावा ही शिवसेनेची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. पण भाजप केंद्रात गेले आठ वर्षे सत्तेवर असून सावरकरांना भारतरत्न किताब का दिला नाही?? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ केले. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला. पण राजपथाचे नामकरण नुसते कर्तव्यपथ करण्याऐवजी वीर सावरकर कर्तव्यपथ असे का केले नाही?? आम्ही वीर सावरकरांच्या कर्तव्यपथावरून पुढे जात आहोत!!, असा संदेश देशाला का दिला नाही??, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केला आहे. त्याचबरोबर भाजपला तरी वीर सावरकर किती कळले आहेत?? सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, त्यांच्या सैनिकीकरणाचे धोरण या बाबी भाजपला किती कळल्या आहेत?? ते धोरण भाजप किती अमलात आणते आहे?? खरे म्हणजे सावरकरांच्या नावाने देशातल्या प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन हवे, ते भाजपने का केले नाही?? असे सवालही सामनाच्या अग्रलेखात केले आहेत.

 सावरकर आणि भारतरत्न

सावरकरांना भारतरत्न किताब देण्याची शिवसेनेची मागणी जुनी आहे भाजपने देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या जाहीरनाम्यामध्ये सावरकरांना भारतरत्न देण्याचा केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र 2019 मध्ये जनतेने कौल देऊनही महायुतीचे सरकार अस्तित्वात आले नाही. त्या ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला नाही.

आता महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप + बाळासाहेबांची शिवसेना या युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. हे सरकार केंद्र सरकारकडे सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातला पाठपुरावा करणार का??, हा खरा प्रश्न आहे.

Rahul Gandhi targets Savarkar, but Shivsena UBT questions BJP over bharat ratna to Veer Savarkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात