विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी काल मालेगाव जोरदार भाषण केले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा राहुल गांधींना इशारा दिला आणि आज त्यावर सामनात अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची महती गायली आहे आणि त्याचवेळी राहुल गांधींना तुमच्याविषयी सहानुभूतीची तयार झाली आहे. ती तुम्ही सावरकरांवर टीका करून गमवाल, असा इशारा दिला आहे.
याचा अर्थ उद्धव ठाकरेंचे सावरकर प्रेम अथवा सावरकर भक्ती निर्भेळ नाही, तर ती राहुल गांधींच्या वाढत्या किंवा घटत्या सहानुभूतीशी संबंधित भेसळ आहे, हेच यातून दिसून येते. उद्धव ठाकरेंना एकीकडे प्रखरपणे नरेंद्र मोदींशी लढायचे आहे. त्यासाठी राहुल गांधींची साथ त्यांना हवी आहे. पण राहुल गांधी वारंवार सावरकरांच्या माफीनाम्याचा उल्लेख करून त्यांचा अपमान करतात ही उद्धव ठाकरेंची खरी पंचाईत आहे आणि इथेच उद्धव ठाकरेंची राजकीय मजबुरी दिसून येते.
भले स्वातंत्र्यवीर सावरकर उद्धव ठाकरेंचे दैवत असतील, पण राहुल गांधींचे ते राजकीय शत्रू आहेत हे विसरून कसे चालेल?? गांधी – नेहरू विरुद्ध सावरकर हा भारताच्या राजकारणातला दोन ध्रुवांचा संघर्ष आहे. त्यातला एक ध्रुव पकडून राहुल गांधी बसले आहेत. त्यामुळे त्यांनी समोरच्या ध्रुवावर हल्लाबोल करणे हे खरे म्हणजे स्वाभाविक आहे. पण त्यामुळेच उद्धव ठाकरेंची राजकीय गोची झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून सावरकरांची कितीही भलामण केली, मोठी आरती गायली तरी तिचा परिणाम राहुल गांधींवर कितपत होईल??, या विषयी मूलभूत शंका आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत आली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाली. सत्ता ही काँग्रेसची मजबुरी आहे. सत्ता गेलेल्या महाविकास आघाडी टिकून राहणे ही काँग्रेसची मजबुरी नाही, तर उद्धव ठाकरेंची मजबुरी आहे. कारण त्यांनी स्वतःचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह गमावले आहे. याच मजबुरीतून काल त्यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांचा अपमान करू नका. तो सहन करणार नाही, असा इशारा जरूर दिला आहे. त्यावर आज सामनात अग्रलेखही लिहिला आहे. पण कालचा इशारा आणि आजचा अग्रलेख याचा परिणाम राहुल गांधींवर काय होणार??, हा खरा प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राहुल गांधी अथवा काँग्रेस सावरकरांचा अपमान थांबवणार का??, त्यांच्यावर राजकीय हल्लाबोल करणे सोडून देणार का??, हे पण प्रश्न आहेत. पण मुख्य प्रश्न तर त्या पलीकडचा आहे, राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सावरकरांवर हल्लाबोल करणे थांबवलेच नाही, तर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार??, या प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरेंच्या सावरकर प्रेम अथवा सावरकर भक्तीचे “रहस्य” दडले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App