सावरकरांचा पुन्हा अपमान; राहुल गांधींना कोलूवर जुंपा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संताप

प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून यावे आणि त्यांना अर्धा-एक तासासाठी कोलूवर जुंपलं पाहिजे, म्हणजे त्यांना वीर सावरकरांच्या यातना कळतील, असे संतप्त उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत काढले. Rahul Gandhi insulted savarkar again, chief minister eknath shinde targets rahul Gandhi in maharashtra legislative assembly

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘वीर सावरकर हे आपल्या महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे दैवत आहेत. देशाचे दैवत असताना ज्या काही त्यांनी मरण यातना भोगल्यात, काळ्या पाण्याची शिक्षा भोगलीये. कोलूवर त्यांना जुंपलंय, अशा परिस्थितीत ज्या हालअपेष्टा त्यांनी भोगल्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी. मी म्हणतोय, राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. अर्धा-एक तासासाठी जरी त्यांना कोलूवर जुंपलं तरी त्यांना वीर सावरकरांच्या यातना कळतील. म्हणून राहुल गांधींचा निषेध करावा तो थोडाच आहे.’



वीर सावरकरांना तुम्ही काय समजता?

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘सत्ताधारी सदस्यांनी जे काही एक दिवस केलं त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी हा संताप, राग, चीड येण्याचं कारण काय, हे देखील आपण तपासलं पाहिजे. वारंवार जर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करालं, आजही राहुल गांधींनी म्हटलं आहे, मी माफी मागायला सावरकर नाही. वीर सावरकरांना तुम्ही काय समजता? म्हणून राहुल गांधींना शिक्षा मिळालीचं पाहिजे.

Rahul Gandhi insulted savarkar again, chief minister eknath shinde targets rahul Gandhi in maharashtra legislative assembly

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub