प्रतिनिधी
नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज अचानक मौन धारण केले त्यांनी दुपारी एक ट्विट केले, “कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है!!” या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.Raut – Somaiya: Sanjay Raut accepts “silence”; Kirit Somaiya says, no, it’s just “stop talking
एरवी संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजप वर तोंडी तोफा डागत असतात. पण आज दुपारी “मौन सबसे अच्छा उत्तर होता है”, असे ट्विट करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
मात्र या त्यांच्या मौनावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांना जोरदार चिमटा काढला. संजय राऊत कसले मौन धारण करत आहेत?? खरं तर त्यांची बोलती बंद झाली आहे. कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात त्यांच्या मित्रा विरोधात आता कोर्टाची ऑर्डर येईल. एकापाठोपाठ एक मंत्री आत मध्ये चालले आहेत. नवाब मलिक देखील असेच आधी बडबड करत होते. पण आता त्यांची बोलती बंद झाली आहे.
त्यांच्या पाठोपाठ हसन मुश्रीफ आणि अनिल परब हे मंत्री आत मध्ये जाणार आहेत. मग संजय राऊत काय बोलणार…?? पण त्यांनी मौन धारण केलेले नाही. त्यांची बोलती बंद झाली आहे!!, असे शरसंधान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर साधले. परंतु त्यानंतर देखील संजय राऊत यांच्याकडून कोणतीही ट्वीट अथवा प्रतिक्रिया आलेली दिसली नाही.
राऊतांना महत्व का देता? : फडणवीस
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला हाणला. संजय राऊतांना इतकं महत्व का देता? ते कोणी सरकारचे प्रमुख, विश्ववेत्ता किंवा फिलॉसॉफर आहेत का? रोज-रोज त्यांच्याबद्दल मला का विचारता? ज्यांच्या विचारांना सर्वोच्च न्यायालयाने कच-याच्या पेटीत फेका असं सांगितलं, त्यांच्याविषयी मला विचारून तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत असल्याची खोचक टीका फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली होती.
दिवा विझण्यापूर्वी फडफडतो : पाटील
फडणवीसांनी दिलेल्या या प्रतिक्रियेप्रमाणेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांच्याबाबत काहीही बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. त्यांच्यावर बोलून आपण त्यांना खूप मोठं करतो. रोज सकाळी ते प्रवचन देतात, त्यांना ते खुशाल देऊ दे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
म्हणून स्वीकारलं मौन?
राज्यात शिवसेनेचे अनेक नेते हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. स्वतः संजय राऊत, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक हे देखील यातून सुटले नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप सातत्याने संजय राऊत करत आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या या टीकेमुळे तर राऊतांनी मौन व्रत स्वीकारले नाही ना, असेही सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App