प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. Pune University Session Exam will be held online, not offline !!
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे महाविद्यालये बंद करावी लागल्यानंतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला होता. पण नंतर महाविद्यालयात सुरू झाल्यामुळे परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी नियुक्त केलेल्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पुन्हा ऑफलाइन परीक्षांची चर्चा सुरू झाली होती. यातून विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यानंतर विद्या परिषदेने ऑनलाइन परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App