पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे.यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे.Pune: PMT buses now converted into women’s toilets Will happen
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज (मंगळवारी) स्थायी समितीने पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या ११ प्रकल्पास मान्यता दिली.पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे.
सिंध सोसायटी औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल बाणेर, आनंद नगर सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान बोपोडी, आरटीओ फुले नगर, लोहगाव बसस्टॉप, संविधान चौक विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेल.
१) यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे. २)या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा असणार आहेत. ३)या बसेसमध्ये टॉयलेट आणि वॉश बेसिन हे एका भागात तर दुसऱ्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री याची सुविधा असले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App