वृत्तसंस्था
पुणे : राज्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्यात 21 मे रोजी 58 हजार 840 ऍक्टिव्ह रुग्ण होते. त्या पाठोपाठ मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. मुंबईत 28 हजार 579 आणि ठाण्यात 26 हजार 248 ऍक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. Pune District is a big hotspot for active patients : 58 thousand 840 people were found on Friday
राज्यात 21 मे पर्यंत 3 लाख 67 हजार 121 ऍक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक 58 हजार 840 रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा हा ऍक्टिव्ह रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक, अहमदनगर, नागपूर येथील परिस्थिती तशी काही चांगली नाही. या भागात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजारच्या पुढे आणि 20 हजाराखाली आहे. अन्यत्र ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1508 आणि 8 हजाराच्या दरम्यान आहे.
एकूणच आकडेवारी पाहता पुणे, मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक, अहमदनगर, नागपूर हे ऍक्टिव्ह रुग्णांचे हॉटस्पॉट बनत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App