वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक


पुणे महापालिकेचे बहूचर्चित असणारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच या विद्यालयात प्रवेश मिळवणून देण्याच्या आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक एजंटांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – महापालिकेचे बहूचर्चित असणारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच या विद्यालयात प्रवेश मिळवणून देण्याच्या आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक एजंटांनी केली आहे. पुणे पालिकेच्या महाविद्यालयासोबतच नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे ही सांगण्यात आले होते. या प्रकरणी अहमदनगर येथील एका नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी तिघांवर आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. promise to get admission in Medical College and cheated १३ people for २.५ cr rupees

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशावह, पारस शर्मा तसेच त्याचे साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे महागरपालीकेच्या वतीने पुण्यात नायडू रुग्णालयाच्या परिसरात भारतरत्न अटल बिहारी वाजेपेयी वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येत आहे. या विद्यालयाला सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत. येत्या काही दिवसांत हे विद्यालय सुरु होण्याची शक्यता आहे. येथे प्रवेशासाठी वार्षिक ७ लाख रुपये शुल्क आहे. या ठिकाणी ७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. आणखी २० जागा भरण्यात येणार आहे.चंद्रशेखर देशमुख याने विमाननगर येथे शिक्षा सेवा इंडिया या नावाने संस्था सुरु केली आहे. तक्रारदारांचा मुलगा याला देशमुख याने डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रवेशासाठी व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश घेऊन देतो, असे सांगितले. त्याच्या प्रवेशाचे बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच निवडपत्रही तयार केले.

ते तक्रारदारांना दाखवत त्यांचा विश्वास संपादन करत प्रवेशासाठी धनादेश आणि ३० लाख ७२ हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. मात्र, मुलाला प्रवेश दिला नाही. याच पद्धतीने सांगोला, पंढरपूर, पुणे, जळगाव अशा विविध ठिकाणच्या आणखी १२ जणांना प्रवेश देण्याच्या बहाण्याने त्यांची २ कोटी ५३ लाख १७ हजार ५५९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

आरोपी देशमुख आणि त्याचे साथिदार हे खोटी माहिती देऊन अनेकांची फसवणूक करीत होते. त्यांनी काही जणांकडून ३५ लाख, कोणाकडून १६ लाख, २० लाख, २५ लाख अशा वेगवेगळ्या रक्कम या चोरट्यांनी घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करीत आहेत.

promise to get admission in Medical College and cheated १३ people for २.५ cr rupees

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण