अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी खासगी गुंतवणुक सुरु व्हावी – शक्तिकांत दास


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘‘कोरोना काळात पीछेहाट झालेली भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्ववत होण्याच्या बेतात आहे. मात्र ती पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यासाठी खासगी भांडवली गुंतवणुकीचा प्रवाह वेगाने सुरु झाला पाहिजे,’’ असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. Private Investment needed

कायमस्वरूपी टिकणारा आणि स्थिर विकास हवा असल्यास खासगी गुंतवणुकीला तरणोपाय नाही, यावरही दास यांनी भर दिला. ‘‘कोरोनाकाळात अर्थव्यवस्था वाढीची गती मंदावली होती. आता कोरोना संपत आल्यावर तिच्यात अजूनही वेगाने आगेकूच करण्याची क्षमता आहे. मात्र खासगी गुंतवणुक हेच त्यावरील उत्तर आहे.



अनेक अर्थतज्ज्ञांनी यावर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज दहा टक्क्यांपासून साडेआठ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. मात्र रिझर्व्ह बँक आपल्या साडेनऊ टक्क्यांच्या अंदाजावर अजूनही कायम आहे. गुंतवणुकीचे खरे चक्र साधारण पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होईल. मात्र तेव्हा बँकांनीदेखील गुंतवणुक करण्यासाठी सज्ज राहावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

Private Investment needed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात