मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची याचिका फेटाळून लावत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.Praveen Darekar’s difficulty will increase, the High Court rejected the petition
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भाजपा मधील नेत्यांकडून आरोप होताना दिसत आहेत. अशातच आता भाजप विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर हे मुंबई बॅंक घोटाळा प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांत चांगलेच चर्चेत आले होते.
त्यांनी या प्रकरणाच्या चैकशी विरोधात कोर्टात याचिका देखील सादर केली होती. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची याचिका फेटाळून लावत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यामुळे गेल्या पाच वर्षातील बँकेच्या आर्थिक व्यवहारांच्या अनियमिततेची चौकशी करण्याचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. चौकशी करण्याच्या या निर्णयाला मुंबै बँकेच्यावतीनं हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
जेव्हा बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारांबात आरोप होतो तेव्हा पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी होणं आवश्यक असतं, असं न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी ही याचिका फेटाळताना नोंदवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App