प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मंगळवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. या निकालानुसार एकूण 200 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
यांनी पटकावला पहिला क्रमांक
या परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद चौगुले या तरुणाने राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर रुपाली माने ही तरुणी मुलींमधून पहिली आहे. तर गिरीश परेकर या तरुणाने मागासवर्ग उमेदवारांधून पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोनामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 लांबणीवर जात 4,5 व 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
HTTPS://T.CO/MLUDDGXTV0. HTTPS://T.CO/CTYCGDOJA0. PIC.TWITTER.COM/UDDPHWSIGJ
— MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION (@MPSC_OFFICE) MAY 31, 2022
अभियांत्रिकी परीक्षेचा निकालही जाहीर
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2020 चा निकालही आयोगाकडून 31 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. 652 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रोहित कट्टे याने पहिला नंबर पटकावत बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या परीक्षांचे संपूर्ण निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
जाहिरात क्रमांक 61/2021 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
HTTPS://T.CO/JPTZOS9SLSPIC.TWITTER.COM/FOF89AP3ND
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App