प्रकाश आंबेडकरांची अट शिथिल?; वंचित आघाडी महाविकास आघाडी बरोबर जाणार?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बैठक हॉटेल ग्रँड हयात मध्ये संपली आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर जायला तयार असल्याची बातमी आली. अर्थात दोन्ही बाजूंनी या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांच्या हवाल्याने काही मराठी माध्यमांनी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर निवडणुकीत एकत्र उतरण्यास तयार असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. Prakash Ambedkar ready to go with MVA but how will be the seat adjustment?

प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांना आघाडीचे ऑफर दिली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायची नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आता मात्र त्यांनी महाविकास आघाडी बरोबर जाण्याची तयारी दाखवल्याच्या बातम्या आल्याने त्यांनी राष्ट्रवादी संदर्भातली आपली अट शिथिल केली काय?, असा प्रश्न तयार झाला आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्याची बातमी आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी बरोबर येण्याची तयारी दाखवल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीत कसे सामावून घ्यायचे?, याविषयी अजितदादांच्या निवासस्थानी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी एकत्र आल्यास महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारला म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीला जोरदार टक्कर उभी राहू शकते, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या आहेत. यासाठी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा अहवाला दिला आहे. वंचित बहुजन आघाडी 2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्याआधीची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एआयएमआयएम पक्षाची आघाडी होती. पण विधानसभा निवडणुकीत ती आघाडी तुटली होती. तरी देखील वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्रपणे 50 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती.

78 विधानसभा मतदारसंघांमध्ये 25 ते 35 हजार मते, तर 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 15000 पेक्षा जास्त मते, तसेच 60 मतदारसंघांमध्ये 10000 पेक्षा जास्त मते, तर उर्वरित 132 विधानसभा मतदारसंघांमध्ये 9000 पेक्षा कमी मते वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. याचा त्यावेळच्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला मोठा फटका बसला होता.मोठा समीकरण बदल

पण त्यावेळी शिवसेना अखंड होती आणि शिवसेना भाजप यांची युती एकत्रित निवडणूक लढली होती. विधानसभेत 161 जागांचे बहुमत शिवसेना-भाजप महायुतीने 2019 च्या निवडणुकीत मिळवले होते. पण त्यानंतर फार मोठ्या राजकीय घडामोडी घडवून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. शिवसेना-भाजप युती तुटली. ठाकरे – पवार सरकार स्थापन झाले. त्यालाही अडीच वर्षे उलटून गेली आणि एकनाथ शिंदे यांचा तब्बल 40 आमदारांचा गट फुटून भाजप बरोबर आला आणि महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे मूळातच महाराष्ट्रातले सगळे राजकीय समीकरण बदलले आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीत आधीच 3 पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असताना त्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला, तर त्यांना 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किती जागा महाविकास आघाडी सोडणार आणि खुद्द महाविकास आघाडीतले 3 घटक पक्ष आपापसात कसे जागावाटप करणार हे दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दा आहेत.

288 पैकी तीन पक्षांना प्रत्येकी 100 देखील जागा येऊ शकत नाहीत. अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला तर 288 ÷ 4 = प्रत्येकी 72 जागा सर्व पक्ष मिळून लढवणार का??, असा महत्त्वाचा प्रश्न तयार होत आहे.

फक्त महापालिका, झेडपी पुरती आघाडी?

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त आघाडी ही विधानसभा निवडणुकीआधी फक्त महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांपूर्वी मर्यादित राहील का?, अशी देखील राजकीय शंका उपस्थित होत आहे. कारण मुंबई सह काही विशिष्ट महापालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची विशिष्ट मर्यादित ताकद आहे. तिचा लाभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होऊ शकतो, असा त्या पक्षाच्या नेत्यांचा राजकीय होरा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे नेते एकत्र येत असल्याचे बोलले जाते. पण त्यात बाकीचे महाविकास आघाडीचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे कशा पद्धतीने सामावून घेतले जातील हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

एकूण महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होण्याची शक्यता मराठी माध्यमांनी व्यक्त केली आहे. पण दोन्ही बाजूंनी या विषयावर अद्याप अधिकृत भूमिका कोणीही जाहीर केलेली नाही. यातच महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाचे खरे भवितव्य दडले आहे.

Prakash Ambedkar ready to go with MVA but how will be the seat adjustment?

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण