विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला असला तरी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने काढलेल्या तोडग्यावर कर्मचारी नाराज असल्याचं पाहायला मिळतंय.
राज्यात काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत काम सुरू केलं असलं तरी, एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव हे आज पासून उपोषणाला बसणार असल्याने संप पुन्हा एकदा चिघळणार असल्यची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी १,१०८ बस रस्त्यावर धावल्या असून १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला आहे. दरम्यान, कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू असून रविवारी ९३ कर्मचारी निलंबित, तर २९ रोजंदार गटातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता ६,४९७; तर सेवा समाप्त कर्मचाऱ्यांची संख्या १,५२५ वर पोहचली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App