मात्र इतर दोन पेट्या करंजवणच्या विहिरीत टाकल्याचे चोरट्यांनी सांगितले. इतर दोन पेट्यांचा शोध सुरू आहे.Police seize three donation boxes from Bhagwan Bhaktigad in Savargaon
विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमधील सावरगावच्या भगवान भक्तीगड येथील तीन दानपेट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या.या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख गोरक्ष पालवे यांनी करत तीन चोरट्यांना ताब्यात घेतले.तसेच त्या चोरट्यांकडूएन एक पेटी जप्त केली.मात्र इतर दोन पेट्या करंजवणच्या विहिरीत टाकल्याचे चोरट्यांनी सांगितले. इतर दोन पेट्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान विहिर पाण्याने तुडूंब भरलेली आहे.त्यामुळे विहिरीतले पाणी उपसणे सध्या सुरू आहे.या प्रकरणी विनायक विठ्ठलराव सानप (वय 51 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान मानलं जातं. त्याचबरोबर बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील सर्व जाती-जमातीचे लोक भगवानगडावर दर्शनासाठी जातात.दरवर्षी दसऱ्याला इथं लाखो लोक जमतात.भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे.गोपीनाथ मुंडे यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App