पोलीसांना झालंय तरी काय? मैं हू डॉन म्हणत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माजी नगराध्यक्षासोबत केला डान्स, पाच पोलीस कर्मचारी अडचणीत


विशेष प्रतिनिधी

जळगाव : पोलीस आणि गुन्हेगारांतील सीमारेषाच पुसट झाल्या आहेत. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अनिल चौधरी या भुसावळच्या माजी नगराध्यक्षासोबत पोलीसांनी मैं हू डॉन आणि ओ शेठ..अक्षरश: डान्स केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पाच पोलीस कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांच्यावर चौकशीअंती दोषी आढल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. Police danced with a former mayor with a criminal background on Mai Hu Don, five police officers in trouble

जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शहरातीलच एका हॉलमध्ये काल आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पोलीस कर्मचाºयांसह भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी ‘में हू डॉन’ आणि ‘ओ शेठ..’ या गाण्यावर शहर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी आणि अनिल चौधरी यांनी ठेका धरला होता. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनिल चौधरी यांच्यावर खंडणी सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या घटनेत अनिल चौधरी यांच्या सोबत डान्स करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेत दोषी आढळून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यातच एका महिलेची चौधरी याने साठ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. औरंगाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर तो फरार झाला होता. माजी आमदार संतोष चौधरी यांनाही अनिल चौधरी याने धमक्या दिल्या होत्या. संतोष यांच पत्नी रेखा चौधरी यांनी त्यांच्या जिवास त्यांचे दीर माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले होते. संतोष चौधरी यांना अडवून अनिल चौधरी यांच्या विरूद्ध जाऊ नकोस, असा अनिल चौधरींचा निरोप दिला. तसेच जीव प्यारा असेल तर अनिल चौधरींच्या विरोधात वागणे सोडून दे, अशी धमकी दिली.

Police danced with a former mayor with a criminal background on Mai Hu Don, five police officers in trouble

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण